फार पूर्वीपासून भारतीय परंपरेत स्नानासाठी रोज उटणेच वापरले जात असे. आयुर्वेद आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालून परंपरेने आलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे 'अभ्यंग स्नान' म्हणजे आधी अंगाला तेल नंतर उटणे लावून केलेली आंघोळ.
आधी संपूर्ण अंगाला अभ्यंग तेल लावून १५ ते ३० मिनीटे मुरू द्यावे. त्यावेळी उटणे पण पाण्यात १५ ते ३० मिनीटे भिजत घालावे. तेल लावणे शक्य नसल्यास भिजविलेल्या उटण्यात दुध घालावे. आंघोळीवेळी प्रथम गरम पाणी अंगावर घेऊन अंग ओले करुन घ्यावे व नंतर ते भिजवलेले उटणे सर्वांगाला चोळून लावावे. ते ५ मिनीटे मुरू द्यावे. त्यानंतर
सुखोष्ण पाण्याने आंघोळीचा आनंद घ्यावा. इथे साबणाचा वापर करु नये..
दिवाळीच्या दिवसांतील अभ्यंगस्नातात नरक चतुर्दशी दिवशी आपण आईचे स्पर्शातून वात्सल्याच्या स्पर्शाचे सुख अनुभवतो दिवाळी पाडव्याचे दिवशी प्रिय व्यक्तीच्या नाजूक स्पर्शाने मोहरुन जातो भाऊबीजे दिवशी बहिणीच्या मायेच्या स्पर्शाने आनंदी होतो. इथे उटणे नात्यातील प्रेमाच्या स्पर्शाचे माध्यम ठरते.
अभ्यंगस्नानामुळे त्वचा मऊ, कांतीमान व तेजस्वी होते. यात नैसर्गिक अस्सल सुगंधी वनस्पती वापरल्याने घामाला दुर्गंधी येत नाही, शरीराला एक मोहक सुगंध येतो, उन्हामुळे किंवा कांही कारणाने काळवंडलेली त्वचा उजळ होते, त्वचेचे आरोग्य सुधारते, हवेतील प्रदूषण व घामामुळे होणारा जंतूसंसर्गास प्रतिबंधक उपाय म्हणून उटणे काम करते.
वाग्भट ऋषींनी आपल्या अष्टांगहृदय या ग्रंथात दिनचर्येत उटण्यासंबंधी पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे.
"उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम् ।
स्थिरीकरणं अङ्गानां त्वक प्रसादकरं परम् ।।" Ref.-अ.हृ.सू.२/१४
उदवर्तनम म्हणजे - उटणे कोरड्या त्वचेवर हृदयाच्या दिशेने चोळून चोळून लावणे. ह्यामुळे कफ व मेद यांचे विलयन होते. म्हणजेच ते वितळून जातात आणि त्यामुळे वाढलेले स्थूलत्व कमी होते. सर्व इंद्रिये व स्नायू धष्टपुष्ट व सशक्त बनतात. त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होतात. उदवर्तनामुळे रक्ताभिसरण पण वाढते. त्वचेवरील मृत पेशी निघून जाऊन नवीन पेशी तयार होतात व रंध्र मोकळी होतात. यामुळे त्वचा तेजस्वी, निरोगी, कांतीपूर्ण, टवटवीत आणि आकर्षक दिसते. म्हणून सर्वांनी रोजच दांडेकरांचे उटणे वापरून आंघोळ करण्याची प्राचीन परंपरा चालू ठेवून निसर्गाने दिलेल्या शरीरसंपदेचे रक्षण करावे यासाठी सिध्द आहे .....
नात्यातील प्रेमाच्या स्पर्शाचा अनुभव देणारे दांडेकरांचे उटणे
| Product Code | SUGMVTLB93 |
| Manufacturer | Dandekar Ayurved |
| Condition | New |
| Weight | 0.1kg |